इंदापूर तालुक्याचा विचार करता हिंदू मुस्लिम कोणतेही सण मोठ्या आनंदाने साजरी करतात - आ. दत्तात्रय भरणे
इंदापूर येथे मुस्लिम बांधवांना दिल्या आमदार दत्तात्रय भरणे यांनी ईद निमित्त शुभेच्छा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्याचा विचार करता हिंदू मुस्लिम कोणतेही सण मोठ्या आनंदाने साजरी करतात असे रमजान ईद निमित्तआज दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी इंदापूर येथे ईदगाह नमाज पठण वेळी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना व्यक्त केले.
यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भरणे बोलताना म्हणाले की,गेली एक महिना या सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा उपवास होता. या महिन्यात एकत्र येऊन सुख दुःख वाटून घेत. मुस्लिम बांधवातील गरीब वंचित आहेत त्यांची अडचण ओळखून त्या बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न आमचे मुस्लिम बांधव करत असतात. इंदापूर तालुक्याचा विचार केला तर नेहमीच हिंदू मुस्लिम कोणतेही सण मोठ्या आनंदाने साजरी करतात. आपण कधीही हिंदू मुस्लिम भेदभाव करीत नाही. शेवटी हिंदू मुस्लिम यांचे रक्त लालच असते. या पूर्वीचे आपलं वातावरण भविष्यात असंच चालू राहू द्या. मला मुस्लिम बांधवांना विनंती करायची आहे. समाजामध्ये काही विशिष्ट वर्ग आहेत. विशिष्ट संघटना आहेत. कुठेतरी गैरसमज भेदभाव करून आपल्यामध्ये कशी दरी निर्माण होईल. आपली राजकीय पोळी कशी भाजाल असा प्रयत्न करतात. आपण सर्वजण हिंदू मुस्लिम असू द्या .आपल्या मध्ये गैरसमज कधीही निर्माण होऊ देऊ नका. आज रमजान निमित्त सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा

