प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २२/ बॅंकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ज्योती क्रांती कॉ-ऑप क्रेडिट सोसा.लि या संस्थेच्या वतीने जेऊर ता. करमाळा येथे आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर ग्राहक सेवा केंद्राचे शानदार उदघाटन संपन्न झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन ह.भ.प.श्री.विठ्ठल महाराज, हे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महापुरुषाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दिपप्रज्ज्वलन करुन उदघाटन केले.
'गावं तिथे ज्योती क्रांती अर्थसेवा' उपक्रमा अंतर्गत ज्योती क्रांतीची बॅंकिंग सेवा परिपुर्ण असुन ग्रामस्थांना आणि आजुबाजुच्या पंचक्रोषीतील नागरीकांना ज्योती क्रांतीच्या विविध योजनांचा निश्चितच फायदा होणार असल्याचे ह.भ.प.श्री.विठ्ठल महाराज यांनी उदघाटन सोहळ्या प्रसंगी मत व्यक्त केले. राज्यभरात एकुण अठ्ठेचाळीस शाखेच्या माध्यमातुन पसरलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेटच्या योजनांची माहिती
ज्योती क्रांती csp निरीक्षक श्री.संदिपान हजारे यांनी दिली.
उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी ज्योती क्रांतीचे चेअरमन मा.श्री.अजिनाथ हजारे व व्हा.चेअरमन मा.श्री.दशरथ हजारे यांचे अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. ज्योती क्रांतीचे व्यवस्थापक यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी ज्योतिक्रांती करमाळा शाखा सर्व कर्मचारी वृंद, csp निरीक्षक, खातेदार-ग्राहक आणि जेऊर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

