shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार यशवंत माने यांची बाजार समितीच्या संचालक पदी बिनविरोध निवड ...


अनेक मान्यवरांनी केला मानेंचा सत्कार

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 
 
इंदापूर: दि. १९/ इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी मोहोळचे आमदार यशवंत माने यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यानिमित्ताने लहुजी शक्ती सेना, मातंग एकता आंदोलन व   शिवाजी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार माने यांचा शिवाजी पवार पञकार, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ, पुष्पहार, शाल व श्रीफळ  देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष जगताप म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचे सेवक असल्याने व लोकप्रिय असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यांची कृषी बाजार समितीवरील निवड सार्थ निवड आहे. यानंतर मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा- उपाध्यक्ष शिंदे म्हणाले की श्री. माने हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व आहेत त्यांच्या या निवडीमुळे सामान्य शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न मार्गी लागणार आहेत. आमदार माने शेतकऱ्यांचा कणा होतील आणि विस्कटलेल्या जीवनाची घडी पुन्हा नीट बसवतील असा आशावाद त्यांनी बोलताना निर्माण केला.

आमदार यांनी आलेल्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच अरविंद ढावरे, दत्ता काळेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या सर्वांचेही आभार मानले.
close