shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांनी लहान मुलींना घास भरून केली इफ्तार पार्टी साजरी.

इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांनी  लहान मुलींना घास भरून केली इफ्तार पार्टी साजरी.

इंदापूर प्रतिनिधी: रमजान ईदच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रोजाचा उपवास केला जातो.इंदापूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने दर्गाह मज्जिद येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लिम समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला होता. ( ता.२०) इंदापूर शहरात माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरने यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या इतर पार्टीमध्ये मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या  इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.
 यावेळी भरणे यांनी या इफ्तार पार्टीत उपस्थित असणाऱ्या लहान मुलींना स्वतः हाताने घास भरवत इफ्तार पार्टी साजरी केली.
 यावेळी त्या लहान मुलींनी भरणे यांना घास भरून इफ्तार पार्टीतला आनंद द्विगुणीत केला. 

या कार्यक्रमांमध्ये आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,अशोक मखरे(सर),तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,अहमद सय्यद अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष, राष्ट्रवादीचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,रमेश शिंदे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे,
 मा. उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, माजी नगरसेवक अनिल राऊत, माजी नगरसेवक पोपट शिंदे,इम्रान मोमीन, सौरभ शिंदे व इतर अनेक मान्यवर व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
close