shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात अवकाळी गारपेटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या...नमिता मुंदडा !

                         
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-                          ##################                                             
केज तालुक्यातील अवकाळी गारपेटीने व अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून केज मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,जिल्हाधिकारी बीड व तहसीलदार मेंढके साहेब केज  यांच्या कडे केली आहे.                  

केज मतदारसंघातील अनेक ठिकाणी प्रचंड गारांसह आज दि.०८/०४/२०२३ रोज शनिवारी अवकाळी पाऊस पडला आहे. गारांसह अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, टरबूज, खरबूज , अंबा सह इतर फळबागा व पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी त्वरित पंचनामे करून तत्काळ भरीव मदत करणे आवश्यक झाले आहे.मुख्यमंञी साहेबांनी  केज तालुक्यातील अवकाळी गारपेटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.                                 

       

तसेच जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी केज तालुक्यातील मृत झालेल्या पशुधनाचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.   

केज तालुक्यातील खालील गावात शेतकऱ्यांचे पशुधन मृत पावले आहेत. १) श्री जयराम तुकाराम हंगे , हंगे वाडी ०१बैल०१गाय २) श्री शशिकांत संपतराव हांगे हांगेवाडी ०१बैल ३)श्री नारायण मुंडे देवगाव ०१बैल ४) श्रीअण्णासाहेब दत्तू मुळीक मांगवडगाव ०१ गाय ५)श्री लक्ष्मण बाबासाहेब आंधळे, रामेश्वर वाडी ०१शेळी वरील शेतकऱ्यांच्या मृत पशुधनाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन नियमानुसार तात्काळ अर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केज मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.
close