shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरात श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन, अखंड नाम जप यज्ञ याग सोहळा संपन्न.

इंदापूर शहरात श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन, अखंड नाम जप यज्ञ याग सोहळा संपन्न.

१४९ जणांनी केले गुरुचरित्र वाचन
 इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहर महतीनगर मधील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन अखंड नाम जप यज्ञ याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अखंड नाम जप यज्ञ याग सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. येथील महतीनगर सोसायटी मैदानात पारायणासाठी १४९ हून अधिक महिला व पुरुष सेवेकरी यांनी सामूहिक पद्धतीने वाचन केले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्राच्या वतीने सप्ताहाच्या काळात विविध याग तसेच सात दिवस अखंड श्री नाम समर्थ जप नामस्मरण अखंड श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन विणा वादन सेवा आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात मंडल स्थापना अग्नीस्थापना स्थापित देवता हवन नित्य स्वाहाकार गणेशयाग मनोबोध याग चंडीयाग स्वामी याग गीताई याग रुद्रयाग मल्हारीयाग वली पूर्णाहुती सत्यदत्त पूजन अखंड हरिनाम जप यज्ञ या नंतर सप्ताहाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.  केंद्राचे केंद्र प्रतिनिधी प्रदीप भगत, पंचकमिटी, दरबार प्रतिनिधी, विभाग प्रतिनिधी, कार्यरत प्रतिनिधी यांनी सप्ताह सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
close