उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डाॅ.उषा भोईटे -पवार द ग्रास रूट चेंज मेकर्स ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानीत.
डाॅ.उषा भोईटे -पवार या लुमेवाडी येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत.
इंदापूर प्रतिनिधी: यशराज रिसर्च फौंडेशन यांच्या वतीने "The Grass root change makers of India " या पुरस्काराने इंदापूर 9लुमेवाडी येथे कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षिका डाॅ.उषा भोईटे -पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
यशराज रिसर्च फौंडेशन यांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करून दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते डाॅ.अभय बंग,माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ.अजयभूषण पांडेय व प्रा.नावकांत भट शास्त्रज्ञ यांच्यासह डॉ.उषा भोईटे पवार यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी यशराज रिसर्च फौंडेशनच्या अध्यक्षा दिपाली भानुशाली, पद्मभूषण पद्मश्री डॉ.गोविंदराजन पद्मानभन उपस्थित होते.
डॉ.उषा भोईटे पवार या पीएचडी केलेल्या इंदापूर तालुक्यातील पहिल्या प्राथमिक शिक्षिका आहेत.तसेच या पुरस्काराने भविष्यात सामाजिक काम करण्याची उर्जा मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.यशराज रिसर्च फौंडेशन कडून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल एक रूपया मानधन घेतले नाही.

