अहमद रजा सोशल फौंडेशन च्या वतीने रमजान ईद निमीत्त शिरखुर्मा किटचे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:
अहमदरजा सोशल फौंडेशनने अॅड. राहुलजी मखरे व भरतशेठ शहा यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरात सालाबादप्रमाणे शिरखुर्मा किटचे वाटप केले.
गरीब मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईद आनंदात साजरी करण्यात यावी यासाठी भरतशेठ शहा व अॅड. राहुलजी मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदरजा सोशल फौंडेशन यांच्या वतीने शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले.
अहमद रजा सोशल फौंडेशन च्या वतीने सरस्वती नगर भागात अल्ताफ काझी,
कसबा व तापी भागात मोहसीन शेख,
व्यंकटेश नगर भागात अमीर पठाण,
बागवान गल्ली व सातपुडा भागात रियाज बागवान,
मोमीन गल्ली भागात जुनेद मोमीन,
टेंभूर्णी नाका भागात हमीद बागवान, तसेच
शेख मोहल्ला भागात अतीक मोमीन या कार्यकर्त्यांनी शिरखुर्मा किटचे वाटप केले.
भविष्यातही अशाच प्रकारे अनेक प्रकारची समाज उपयोगी कामे फौंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमद रजा सोशल फौंडेशन चे सदस्य अतिक मोमीन, तोसिफ बागवान, जुनेद जिकरे, सलमान शेख, रियाज शेख, जुनेद शेख तसेच अनिस शेख यांनी दिली.

