शौकतभाई शेख
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॉलनी येथील रहिवासी मेजर संदीप गोरख वराडे हे भारतीय सेना दलात १८ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सोहळा शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटात पार पडला प्रथमतः शहरातील शहीद स्मारकास मेजर संदीप वराडे, अहमदनगर येथील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये सध्या सेवेत असलेले व श्रीरामपूर येथील रहिवासी डॉक्टर (एम.डी. मेडिसिन) कर्नल सोमेश्वर गायकवाड माजी आमदार भानुदास मुरकुटे, त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार यांच्या हस्ते स्मारकास पुष्पचक्र ( रीथ) अर्पण करण्यात आले. त्यानंतर त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून तिरंगा लावून सजवलेल्या खुल्या जिप मधून देशभक्तीपर गीते लावून मिरवणूक काढण्यात आली जी शहरवासीयांसाठी प्रथमच एका सेवानिवृत्त जवानाची मिरवणूक काढण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
राम नवमीचा उत्सव साजरा होत असल्याने मिरवणूक शहीद भगतसिंग चौक, सरस्वती कॉलनी रोड ,काळाराम मंदिर मार्गे स्वयंवर मंगल कार्यालय येथे समाप्त झाली, मंगल कार्यालयात आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी,औक्षण दुतर्फा रांगेत सेवानिवृत्त जवानास पुष्पवृष्टी करून विचार मंच्यावर नेण्यात आले. त्यानंतर मेजर वराडे यांच्या संपूर्ण परिवाराचा मोठ्या गुलाब पुष्पहाराने सत्कार करण्यात आला, व त्रिदल सैनिक सेवा संघाच्या सर्व सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शासकीय राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे त्रिदल सैनिक सेवा संघाचे सर्व सेवानिवृत्त माजी सैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले माजी आमदार भानुदास मुरकुटे हे म्हणाले की देशाचा सैनिक सीमारेषेवर सातत्याने ड्युटी देत असल्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी सुरक्षित आहोत म्हणून सर्व सैनिकांच्या कार्याला मी सलाम करतो. माजी नगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगर सेवक रवी पाटील, मा.न.से. दीपक चव्हाण, परिवर्तन फाउंडेशन श्रीरामपूर चे अध्यक्ष, माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, महाराष्ट्र बँकेचे माजी प्रबंधक बी.बी. खंडीझोड, इंडिया इन्शुरन्स चे गोरख आढाव आदि उपस्थित होते.
डॉक्टर कर्नल सोमेश्वर गायकवाड व माजी सैनिक मेजर बाळासाहेब उंडे यांनी पुढील वाटचालीस वराडे यांना शुभेच्छा दिल्या त्रिदलचे मेजर बाळासाहेब बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्रिदल ही काही वेगळे संघटन नसून तिन्ही दल स्थलसेना, जलसेना व वायुसेना अशा तिन्ही जणांना सामावून घेण्याचे काम त्रिदल सैनिक सेवा संघाने केले आहे, आणि त्यामुळेच संघटनेचे नाव त्रिदल सैनिक सेवा संघ असे ठेवले आहे. त्याच माध्यमातून आज राज्यभर त्रिदल सैनिक सेवा संघ अनेक माजी सैनिकांच्या समस्या दूर करण्यात हिरीरीने भाग घेऊन माजी सैनिकांना न्याय देण्याचं काम करत आहे.
तालुकाध्यक्ष मेजर संग्रामजीत यादव त्यांनीही भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या, त्रिदल सैनिक सेवा संघ नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले की धन्य आहेत त्या आई वडील की ज्यांनी आपल्याला एकुलता एक मुलगा असताना मातृभूमीच्या रक्षणासाठी 18 वर्षासाठी पाठवला असेच अनेक नागरिकांनी देखील पाठवले पाहिजे धन्य आहे ती पत्नी देखील कि तीने कुठल्याही पद्धतीचा हट्ट किंवा आई- वडिलांना कुठलाही त्रास न देता व आपल्या सासु सासऱ्यांना आपुलकीने व सैनिक पतीस मोठी मोलाची साथ दिली आहे ,मेजर वराडे यांनी सत्कारास उत्तर देताना म्हणाले की मला सर्वात जास्त प्रमाणात माझ्या 18 वर्षाच्या सेवेत माझे आई वडील, पत्नी व मित्र यांनी कायमच मोलाची साथ दिली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक वाघ यांनी केले.

