shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीसंत गोरा कुंभार यांच्या ७०६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन..!

शौकतभाई शेख
श्रीरामपूर - शहरातगत शिरसगांव येथील इंदिरानगर मधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे श्रीसंत गोरा कुंभार यांच्या ७०६ व्या पुण्यतिथीनिमित्त साहित्य पुरस्कार वितरण, वाचनालय उदघाटन,साहित्य परिसंवाद, कवितावाचन,पुस्तक प्रकाशन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी दिली. 



 


संत शिरोमणी श्रीसंत गोरा कुंभार (१२६७ ते १३१७) यांना मध्ययुगीन काळात सर्व संतमंडळी गोरोबाकाका म्हणत असत.सर्वात मोठे,अनुभवी आणि उत्कट भक्तीचे आदर्श असलेले संत गोरा कुंभार यांनी श्रीविठ्ठल, रुक्मिणी,पंढरी, वारकरी भक्ती जाणिवेतून अनेक अभंग लिहिले, त्यापैकी सकल संत गाथेत २० आणि इतर ०३ असे २३ अभंग उपलब्ध आहेत. मराठीत 'श्रीसंत गोरा कुंभार चरित्र '-र. रा. गोसावी,वीणा गोसावी, श्रीसंत शिरोमणी गोरा कुंभार चरित्र '-प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, 'भारतीय कुंभार समाजातील प्राचीन संतकवी चरित्र व काव्य ', 'धांडोळा : भारतीय कुंभाराचा 'भाग ०१, ०२, -रामलिंग कुंभार, 'गोरोबा चरित्रामृत"-सदाशिवराव पाटील, 'श्रीसंत गोरोबाकाका -भावदर्शन गाथा '-हरिचंद्र मंदिलकर, 'संत गोरा कुंभार :व्यक्ती आणि वाड्.मय '-प्रा. विलासराव तुळे एम. फिल.'भारतीय कुंभार समाजातील संत '-डॉ. बाबुराव उपाध्ये,, 'कुंभार समाज :इतिहास आणि परंपरा '-संपादक उत्तम गोराडकर -मांजरमकर, ॲड, संजय रामराव रुईकर, 'संत गोरा कुंभार विशेषांक -संपादक :सचिन परब आदी पुस्तके प्रकाशित आहेत.

१९९० पासून साहित्य प्रबोधन मंच, वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे श्रीसंत गोरा कुंभार पुण्यतिथी साहित्यिक, समाजप्रबोधन उपक्रमांनी साजरी केली जाते मंगळवार दि.१८ एप्रिल २०२३ रोजी  सकाळी १० वाजता इंदिरानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या श्रीसंत गोरा कुंभार पुण्यतिथी विविध उपक्रमास उपस्थित राहवे असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

close