shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठा येथे श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा

सालाबाद प्रमाणे राम नवमी निमित्त असणारा अखंड हरिनाम सप्ताह मोठया उत्सहात साजरा झाला. रविवार दिनांक ०२/०४/२०२३ रोजी ह.भ प .दिगंबर (महाराज ) जाधव यांचे  काल्याचे हरी कीर्तन झाले* कीर्तनासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला भगिनी, बालगोपाल , उपस्थित होते.   गावातील अनेक दानशूर लोकांनी महाराजांची बिदागी दिली, त्याच प्रमाणे  वारकरी, विणेकरी यांच्यासाठी रोजच्या पंगती चे आयोजन करून अन्नदान केले .शेवटच्या दिवशी श्री पोपटराव गुलाबराव काटे याचे कडून  महाप्रसादाचे आयोजन केले गेले . ग्रामस्थांनी वर्गिनी स्वरूपात भरीव आर्थिक मदत हि केली.शेजारील गावातील ह.भ प खामकर बंधू , ह.भ प खोमणे , ह.भ प झिटे महाराज ह.भ प. दादासाहेब गवळी यांसारखे दिग्गज गायक कीर्तनासाठी लाभले.  त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढत गेली . 

कौठा येथील गरुदत्त मंडप डेकोरेटर्सचे मालक गणेश शिपलकर, गणेश ऑफसेट चे सर्वे सर्व  चंदू गायकवाड, , संचालक बंडू परकाळे, किशोर परकाळे,संभाजी माने, प्रदीप निंबाळकर राहुल माने, प्रकाशआप्पा शिपलकर,  दिगंबर  परकाळे, हभप अण्णासाहेब परकाळे, हभप बाळासाहेब  राऊत, हभप हनुमंत परकाळे यान सह गावातील अनेक भाविक भक्तांनी द्यात , अज्ञात  ग्रामस्थांनी  कार्यक्रम  यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले . कार्यक्रमाचे व्यवस्थापन  ह.भ प पोपट भाऊ  परकाळे, ह. भ. प. हौसराव (आण्णा) परकाळे  ह.भ प राजाराम माने,हभप दिगंबर परकाळे ह. भ. प सुनिल शिपलकर  ह.भ प साळुंके महाराज , ह. भ. प चंद्रकांत मगर ,ह.भ प नामदेव आबा सुपेकर यांनी केले .
close