shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


नगर : ४ / ऐतिहासीक अहमदनगर शहरातील लक्ष्मीबाई कारंजा चौक येथे वर्धमान युवा परिवार मार्फत भगवान महावीर जयंती  मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.

 भगवान महावीर जयंती निमित्ताने वर्धमान युवा परिवार आयोजित भक्ती संध्या कार्यक्रम शिल्पा गार्डन येथील वासुपूज्य स्वामी मंदिरात यशस्वीरित्या पार पडला. जैन समाज हा अत्यंत शांत संयमी समाज मानला जातो. यावेळी 
अनेक  सामाजिक व राजकीय व्यक्तींची उपस्थिती दिसून आली . 

 लक्ष्मीबाई कारंजा येथे आकर्षक व मनमोहक चौक सजावट करण्यात आली . तसेच  "तीर्थक्षेत्र वाचवा, एकत्र राहा " ही रांगोळी नगरकरांचे लक्ष वेधणारी ठरली. महावीर जन्म कल्याणक समिती तर्फे आनंदधाम येथे उत्कृष्ट रांगोळी काढल्याबद्दल व चौक सजावट केल्याबद्दल पारितोषिक देण्यात आले. 

 अहिंसा बाईक रॅली ही काढण्यात आली. ही रॅली नगर जिल्ह्याचे आकर्षक बिंदू बनली . यामध्ये सकल राजस्थानी संघटन सोबत वर्धमान युवा परिवार, जैन युथ आयकॉन व सर्व मंडळांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून महावीर जन्मोस्तव उत्साहात व एकीचा संदेश देऊन साजरा केला. यावेळी सर्व जैन समाजातील बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
close