ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यातील देहरे नगरीत राहत असलेल्या व बारा-पंधरा वर्षात माणसांचा एक मोठा गोतावळा निर्माण करणारे शांत, संयमी, हुशार ,कुशाग्र व मदतीला धावून येणारे सामान्य व्यक्तीमत्व म्हणजे प्राध्यापक सुहास पाखरे. अत्यंत सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले व आई वडिलांची गरिबी जाणून आयुष्यात काहीतरी आदर्श करण्याचे ध्येय घेऊन लहान पणापासूनच अभ्यासाची रुची असलेले तसेच प्रथम इंजीनियरिंग नंतर एमबीए पदवी घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आगळावेगळा ध्यास घेत परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी येथे नोकरी करत आपला प्रवास सुरू केला. राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व व श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार बबनरावजी पाचपुते यांच्या परिक्रमा शैक्षणिक संस्थेत कार्य करत असताना राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात हजारोंच्या संख्येने माणसांचा गोतावळा तयार करणारे प्रा. सुहास पाखरे होत.
लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची फार आवड होती तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रिकेट क्षेत्रात त्यांचा एक नाव लौकिक आहे. त्यांच्या अंगी असलेला एक महत्त्वाचा गुण म्हणजे एक उत्कृष्ट वक्ते सुद्धा आहेत. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सूत्रसंचालन व उत्कृष्ट नियोजन करण्यात त्यांचा हातकंडा आहे .काही वर्षे त्यांनी डॉ.डी वाय पाटील तळेगाव पुणे व अडसूळ शैक्षणिक संकुल अहमदनगर येथे व्यवस्थापन क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम केले .ते आता सध्या नवसह्याद्री शैक्षणिक संकुल नायगाव, पुणे येथे एमबीए विभागात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत .अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांशी सुसंवाद करून त्यांना आधुनिक जगाची ओळख करून देण्यात ते पटाईत आहेत .नव सह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पोपटरावजी सुके साहेब व ग्रुप संचालक माननीय सागर जी सुके सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या उपक्रमात ते नेहमी अग्रेसर असतात. अगदी कमी वयात त्यांनी रोम, इटली, पॅरिस, बेल्जियम ,स्वित्झर्लंड, नेदरलँड , व थायलंड अशा विविध देशात आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेऊन अभ्यास दौरे केले आहेत. करोना च्या अगदी वाईट दिवसात सामाजिक प्रबोधन व उपक्रम घेऊन माणुसकीचा धर्म जपला.
2021 मध्ये त्यांना 'राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या यशामागे आई-वडील ,पत्नी , मुली ,भाऊ , नातेवाईक व सर्व मित्र परिवार नेहमीच खंबीरपणे उभा असतो. नगर- पारनेर मतदार संघाचे आमदार व जागतिक करोना योद्धा माननीय निलेशजी लंके साहेब यांचे अगदी जवळचे मित्र व राजकीय उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजक म्हणून ते ओळखले जातात. अशा सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाला उदंड आयुष्याच्या मन भरून शुभेच्छा.
शुभेच्छूक:
श्री.रमेश जेठे (सर)
संपादक- "शिर्डी एक्सप्रेस"

