शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
राजकीय बातमी
सावळविहीर बुद्रुक येथे विविध विकास कामांची उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे व्यासपीठावरून आपल्या भाषणातून खंडकरी शेतकऱ्यांचे राहिलेले प्रलंबित प्रश्न भोगवटा दोन रद्द करून तो एक करावा एक एकराच्या आतील शेतकऱ्यांना एक एकर जमीन देऊन रेडी रेकनर दर रद्द करावा शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची रकमेची शासनाने आकारणी करू नये, दि गोदावरी शुगर मिल्स लिमिटेड लक्ष्मीवाडी या कारखान्याच्या हद्दीमधील रहिवासीधारकांचा जागेचा व घरकुलाचा प्रश्न त्याचप्रमाणे दुकानदारांचा गाळे बांधण्याचा प्रश्न मुस्लिम ख्रिश्चन कब्रस्तानचा प्रलंबित अशा मागण्या आग्र हक्काने त्वरित सोडवाव्यात.
अशी मागणी व्यासपीठावरून श्री बाळासाहेब जपे पाटील यांनी व्यक्त केली

