shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंदापूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या वाणिज्य शाखेचा 91.03 टक्के निकाल तर कला शाखेचा 70.9 टक्के निकाल तर व्यवसाय शिक्षण विभागाचा 89.74 टक्के निकाल

बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंदापूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या वाणिज्य शाखेचा 91.03 टक्के निकाल तर कला शाखेचा 70.9 टक्के निकाल तर व्यवसाय शिक्षण विभागाचा 89.74 टक्के निकाल.
      इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी 2023 इयत्ता 12 वी परिक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी जाहिर झाला असून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील इंदापूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 91.03 टक्के लागला तर कला शाखेचा निकाल 70.9 टक्के तर व्यवसाय शिक्षण विभागाचा 89.74 टक्के निकाल लागला आहे.
   यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे ,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी अभिनंदन केले.
    कला शाखेत प्रथम जाधव वैभव हनुमंत 83.83 टक्के, द्वितीय  कु.खांडेकर जान्हवी बाळासाहेब ८२.१७ टक्के, तृतीय देवकर प्रतीक धनाजी 69 टक्के
      वाणिज्य शाखेत प्रथम कु.पवार प्रियंका रामचंद्र ८१.८३टक्के, द्वितीय कु.तरंगे रेवती माणिक 80.33 टक्के, तृतीय चिंचकर आशिष महादेव 78.33%
    व्यवसाय शिक्षण विभागामध्ये प्रथम सरवदे अक्षय बाबासाहेब 64.17%, द्वितीय गरड करण अंकुश 61%, तृतीय जगताप सुरज सुनील 59.33% गुण संपादन करून यशस्वी झाले.
close