प्रतिनिधी : सचिन गांधी
चिचोंडी पाटील : ८ / नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती नगर आत्ताच झालेल्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती श्री हरिभाऊ कर्डिले यांची सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघातून विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल यांचा भव्य नागरिक सत्कार चिचोंडी पाटील मध्ये करण्यात आला.
नगर तालुका युवा सेना शिवसेना तालुकाध्यक्ष श्री सचिन (काका )ठोंबरे पाटील यांच्या हस्ते विद्यमान संचालक श्री हरिभाऊ कर्डिले पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक मा. सरपंच श्री बाजीरावजी हजारे नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक (बापू )कोकाटे नगर तालुका भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष व माजी सरपंच श्री मनोज (भाऊ) कोकाटे मा. उपसरपंच विद्यमान सेवा सोसायटी संचालक श्री महेश (काका) जगताप मा. उपसरपंच माजी चेअरमन श्री पांडुरंग ससे मा. ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर हजारे ग्रामपंचायत सदस्य दीपक हजारे श्री बाळासाहेब ठोंबरे श्री रघुनाथ कोकाटे श्री देविदास कोकाटे श्री अंबादास कोकाटे श्री लहानु वाडेकर श्री आनंदा मुटकुळे श्री प्रकाश जाधव श्री काकासाहेब कोकाटे श्री कल्याण पाटील जगताप श्री गंगाधरेकर श्री दिनकर भोस गुरुजी श्री बाबासाहेब पवार सर श्री दत्तात्रय वाडेकर वज्येष्ठ नागरिक संघ आदी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते .
त्यांच्या विजयाने चिचोंडी पाटील गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नगर तालुक्याचे भाग्यविधाते माजी राज्यमंत्री मा.आ. श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना अनेक उपयोगी सुख सोयी निर्माण करून देऊ व त्यांच्या हिताची निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी दिले श्री हरिभाऊ कर्डिले यांना पुढील राजकीय वाटचालीस सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या .

