जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल भिकोबानगर मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून केले अभिवादन.
नर्सरी ते आठवीपर्यंतचा निकाल जाहीर करून
आर. टी. एस. ई २०२२-२३ जिल्हास्तरीय परीक्षेत निवड झालेले व स्कॉलरशिप परीक्षेमधील पात्र विद्यार्थ्यांचा केला सत्कार.
शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी: भिकोबानगर ( ता. बारामती) शनिवार (ता. ६ जून ) जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल भिकोबानगर मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ नर्सरी ते आठवीपर्यंतचा निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे बापूराव दौलतराव कोकरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, सतीश सर्जेराव जगताप नवनिर्वाचित संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, शोभाताई विलास कदम नवनिर्वाचित संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, संतोष मचाले सर फाउंडर ऑफ सन क्रिस्टल एज्युकेशन अँड करियर गायडन्स , या दिवसाचे औचित्य साधून इंटरनॅशनल रंगोत्सव कॉम्पिटिशन मधील मुलांचा बक्षीस वितरण सोहळा पार पाडण्यात आला. तसेच आर. टी. एस. ई २०२२-२३ जिल्हास्तरीय परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी , स्कॉलरशिप परीक्षेमधील इ.पाचवी व इ. आठवी मधील पात्र विद्यार्थी यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूलचे अध्यक्ष विनोद जगताप सर यांनी केले तसेच संतोष मचाले सर यांनी मुलांच्या बौद्धिक विकासासाठी पालकांना मार्गदर्शन केले . पालकांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. स्कूलच्या प्रिन्सिपल जगताप मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

