झगडेवाडीला आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर.
इंदापूर प्रतिनिधी: झगडेवाडी( ता. इंदापूर) या गावाला जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून सन २०२२- २३ या वर्षातील आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार (स्मार्ट ग्राम) जाहीर झाल्याचे ग्रामसेवक सतीश अंकुश धायगुडे यांनी सांगितले.
दि. ६ एप्रिल २०२३ रोजी आर. आर.( आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार (स्मार्ट ग्राम) सन २०२२- २३ च्या निवडी कामे अजिंक्य येळे गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समितीने तपासणी केली होती.
यामध्ये ग्रामपंचायत झगडेवाडीने केलेल्या ग्रामपंचायत आय. एस. ओ.(ISO) करणे .स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान इत्यादी मुद्द्यांवर सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद, विविध विभागातील ग्रामस्थरीय कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या मदतीने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा परिषद पुणे यांचे कडून तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला. यासाठी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सरपंच अतुल झगडे यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे ग्रामसेवक सतीश धायगुडे यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------
झगडेवाडी गाव इंदापूर तालुक्यात सुंदर गाव म्हणून जाहीर झाले व आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला याचा आनंद असून हा पुरस्कार झगडेवाडी ग्रामस्था मुळे शक्य झाला. या पुढील पुरस्कारासाठी झगडेवाडी गावाला जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळवण्यासाठी सर्व ग्रामस्थ व अधिकारी यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहोत .
- अतुल झगडे .
सरपंच झगडेवाडी.
----------------------------------------------------------------
झगडेवाडी गाव हे इंदापूर तालुक्यात सुंदर गाव म्हणून प्रथम आल्याबद्दल सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य व अधिकारी यांचे मनापासून अभिनंदन .जसे तालुक्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला तसा जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरती झगडेवाडी गावाच्या नावलौकिक व्हावा.
- विजयकुमार परीट.
गट विकास अधिकारी इंदापूर पंचायत समिती.

