पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारमुळे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचणार - तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महिलांसाठी पुरस्कार सुरू केल्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे आभार- अनिताताई खरात .
इंदापूर प्रतिनिधी: प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तुत्वान महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार महाराष्ट्र शासनाने महिला बाल विकास विभागाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायत द्वारे देण्यात येणार असल्याने या पुरस्कारामुळे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचणार असून त्यांच्या कार्याचे जतन पुढील पिढीमध्ये होणार आहे. त्याबद्दल तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांनी शिंदे फडणवीस सरकारचे मनापासून आभार मानले.व इंदापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करावेत व अहिल्यादेवींची जयंती प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात व घराघरात साजरी व्हावी असे आव्हान त्यांनी माहिती देताना व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायती कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शासन निर्णय क्रमांक म स पु - २०२३/प्र. क्र./कार्या-२ नुसार दिनांक ९ मे २०२३ रोजी ठरवले आहे.
----------------------------------------
पुरस्काराचे स्वरूप: प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दोन महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व नारळ, रोख रक्कम रुपये ५०० प्रति महिला यांना देण्यात येणार.

