श्रीरामपूर प्रतिनिधी:
उम्मती सोशल वेलफ़ेयर सोसायटी, श्रीरामपूर व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१३ मे २०२३ रोजी 'मोफत मोतीबिंदु, काचबिंदु, तिरळेपणा व इतर नेत्रविकार निदान व उपचार शिबिराचे' आयोजन खासदार गोविंदराव आदिक अँग्लो उर्दू हायस्कूल श्रीरामपूर येथे करण्यात आले होेते. सदर शिबिराचा जवळपास ३८२ रुग्णांनी लाभ घेतला.
सदर शिबिरासाठी अध्यक्ष म्हणुन अतीरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वसंतराव जमधडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन दै.राष्ट्र सहयाद्री चे संपादक करण नवले, कांबळे, प्रभागाचे मा.नगरसेवक रईसभाई जहागीरदार, मा. नगरसेवक मुख्तारभाई शाह, तुलसी हॉस्पिटलचे डॉ.कुलदीप, डॉ.कृष्णा आदि उपस्थित होते.
शिबिराचे उदघाटन मौलाना इर्शादउल्लाह यांच्या पवित्र कुरआन शरीफच्या पठणाने झाली. मौलाना साहेबांनी आपल्या प्रवचनातुन सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'उम्मती'चे अध्यक्ष श्री.सोहेल बारूदवाला यांनी केले. त्यांनी उम्मतीने आयोजित केलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य उपक्रमांची माहिती दिली.
शिबिराचे अध्यक्ष डॉ.वसंतराव जमधडे यांनी 'उम्मती'चे विशेष अभिनंदन केले तसेच 'उम्मती'च्या पुढील आरोग्यविषयक कार्यक्रमास सर्वतोसहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संपादक करण नवले यांनी 'उम्मती' ही कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता अहोरात्र झटणारी एक बिगरराजकीय सामाजिक संस्था आहे असे सांगुन उम्मतीचा गौरव केला. रईस जहागीरदार यांनी 'उम्मती'च्या यशस्वी घौड़दौड़ीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर शिबिरात मोतीबिंदु, काचबिंदु, दृष्टीदोष, तिरळेपणा व इतर नेत्ररोगाच्या जवळपास 382 रुग्णांची मोफत तपासणी करुन त्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. त्यापैकी सुमारे १०८ रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या सर्व रुग्णांची नाशिक येथे नेण्याची, राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 'उम्मती'चे सचिव डॉ.तौफीक शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष अस्लम सय्यद यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष फिरोज पठाण सर,सहसचिव शहानवाज गुलाम सर, इरफान शेख, युसुफ लखानी, अॅड.आरिफ शेख माजिद मिर्ज़ा, शाकिफ़ शेख, समीर शेख, इसहाक शेख,फारूक मेमन,वसीम जहागीरदार,शाहरुख बागवान आदींनी परिश्रम घेतले.
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

