shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील रोहन गलांडे यांनी केली गौतमी पाटीलला चक्क पत्र लिहून लग्नाची मागणी !


तु भारी तुझ्या घरी तु होती का माझी परी!!.

 प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील  रोहन गलांडे पाटील यांनी दिले गौतमी पाटीलला पत्र विषयी सविस्तर वृत्त असे की गौतमी पाटील तु भारी तुझ्या घरी पन तु होती का माझी परी ,मी  रोहन  गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे पत्र लिहीण्याचे कारण एका मुलाखतीत तुला  कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि , “आता मी २५ वर्षांची आहे. 



लग्न करून घरसंसर थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून ईच्छा आहे म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.” तरी तुझ्या वरील तुझ्या सर्व ईच्छा अटी मला मान्य आहेत तरी मी रोहन गलांडे( पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे तरी तु जशी आहेस तशीच मला आवडली आहे जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसेल तरी मी मानुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे .




माझे वय २६ वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे,तु जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ऐ पत्ता मु.पो.चिंचोली माळी तालुका केज , जिल्हा बीड , या पत्त्यावर तु मला भेटायला ऐ मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे असे पत्रकार रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. तर गौतमी पाटील करणार का लग्न  रोहन  गलांडे पाटील यांच्या सोबत असा प्रश्न पडला आहे.

close