पुणे येथील नामांकित शैक्षणिक संस्थेपैकी एक नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या संस्थेतील एमबीए विभागातील सुहास बाबासाहेब पाखरे यांना नुकत्याच 'वथ्री वेलनेस फाउंडेशन लखनऊ, उत्तर प्रदेश 'यांच्या वतीने देण्यात येणारा "राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार "जाहीर झाला .
शैक्षणिक, सामाजिक ,आर्थिक ,राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. डॉ.सुहास पाखरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मागील पंधरा वर्षांच्या कार्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हा पुरस्कार मिळण्यामागे नव सह्याद्री शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा.पोपटरावजी सुके साहेब ,ग्रुप डायरेक्टर मा.सागर जी सुके सर ,डॉ. तानाजी दबडे संचालक एमबीए ,डॉ.ओतारी प्राचार्य फार्मसी, प्रा.पंकज भोकरे प्राचार्य पॉलीटेक्निक ,प्रा. किरण पवार प्राचार्य गुरुकुल संकुल , डॉ.लक्ष्मण डोईफोडे एमबीए विभाग प्रमुख तसेच शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांचे मोलाचे योगदान आहे असे ,सुहास पाखरे म्हणाले .शैक्षणिक पंधरा वर्षाच्या काळात परिक्रमा शैक्षणिक संकुल श्रीगोंदा डॉ. डी .वाय .पाटील शैक्षणिक संकुल तळेगाव दाभाडे ,अडसूळ टेक्निकल कॅम्पस अहमदनगर मधील सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले .आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक यशामागे आई-वडील ,पत्नी, मुले ,नातेवाईक ,देहरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व सहकारी नेहमीच मदतीसाठी अग्रेसर असतात असे सुहास पाखरे यांनी सांगितले.



