इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ३१ मे २०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव इंदापूर शहरातील नवीन कोर्टाच्या समोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून इंदापूर तालुक्यातील विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती उत्सव संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी सभापती विलासराव वाघमोडे,बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव राहुल मखरे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, मुख्याधिकारी रामराजे कापरे, उपजिल्हा रुग्णालय इंदापूर वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले, डॉ. संतोष खामकर,उत्सव समितीचे मार्गदर्शक पांडुरंग मारकड व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र रेडके ,निमंत्रक नानासाहेब खरात यांनी दिली. तसेच संयोजकांनी सर्व समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमांमध्ये सकाळी ८:३० वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. ९:३० वाजता प्रतिमा पूजन,१० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा.१०:३० ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.

