shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कान्हेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश खरात, तर व्हा.चेअरमनपदी सौ.विमल खरात यांची एकमताने निवड*

श्रीरामपूर प्रतिनिधी:
माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या ताब्यातील कान्हेगाव विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी गणेश खरात यांची तर व्हा.चेअरमन पदी सौ.विमल खरात यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी आर.के. जाधव यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलविण्यात आली होती.

चेअरमनपदाची सूचना बाबा चौधरी यांनी मांडली त्यास अनुमोदक म्हणून सर्जेराव खरात यांनी अनुमोदन दिले. तर व्हा.चेअरमन पदाची सूचना सुनिल गिरी यांनी मांडली त्यास सौ.जयश्री सुनिल खरात यांनी अनुमोदन दिले. सदर मिटींग खेळीमेळीत पार पडली. निवडणूक अधिकारी यांनी वरील निवड जाहिर केल्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली. 
           नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे व अशोक कारखाना संचालक मंडळाने अभिनंदन केले. सदर निवडीकरीता रावसाहेब खरात, गिताराम खरात, सुनील खरात, सुनिल गिरी, विशाल खरात, बाबा चौधरी, सर्जेराव खरात, वसंत अप्पा खरात, सोन्याबापु खरात, प्रकाश चौधरी, भिमराज खरात, उत्तमराव खरात, शिवाजी थोरात, जनार्दन खरात, विकास खरात, अशोक गि. खरात, प्रदिप खरात, अनिल खरात, ऋषी खरात, सुधाकर खरात, अशोक नाना खरात, ज्ञानदेव पावसे, विलास तुपे, संदीप खरात, भरत खरात, मनोज खरात, शिवाजी खरात, महेश खरात, राजेंद्र खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर
close