श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालूक्यातील पीडित, समस्याग्रस्त महिलांचे संजय गांधी,बालसंगोपन,शिधापत्रिका,घरकूल, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ, आयुष्यमान भारत योजना तसेच कृषि विभाग, आरोग्य विभाग,पशु संवर्धन विभागांच्या योजनांची माहिती व या संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आज मंगळवार दि.३० मे २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत तहसील कार्यालय, प्रशासकिय इमारत श्रीरामपूर याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्री शक्ती समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिबीरस्थळी सर्व शासकीय विभागाच्या योजना, विभागांचे अधिकारी असणार आहेत. सर्व गरजू महिलांनी संबंधित कागदपत्रांसह हजर राहून आपल्या समस्या शिबिराच्या माध्यमातून सोडवून घ्याव्यात असे आवाहनही मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, मनिषा कोकाटे,तथा मिशन वात्सल्य तालुका शासकीय समिती, श्रीरामपूर यांच्यावतीने
करण्यात आले आहे.
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

