दोन वर्षा पासून रखडलेले मांडवे - उक्कडगाव - नारायणडोहो या रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा निवेदन/ठिय्या आंदोलन करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष.
येत्या पाच तारखेपर्यंत काम सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार- प्रकाश पोटे.
रमेश जेठे (सर) अहमदनगर (विशैष प्रतिनिधी)- अहमदनगर तालुक्यातील उक्कडगाव,मांडवा, नारायणडोह,येथिल १६७ नं. रस्त्याचे काम सुरू होऊन आज अखेर जवळपास दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. या रस्त्यासाठी शासनाने सुमारे 2.5 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. परंतु अद्यापही या 20 टक्के आरसीसी आणि 80 टक्के भागावर डांबरीकरण असणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून खराब असल्याने सर्व सामान्यांना दिलासा म्हणून,त्या ठिकाणी एवढा मोठा निधी देण्यात आला असून काही लालची राजकारण्यांना मुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हा रस्ता अद्याप देखील पूर्ण झाला नाही.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अधिकाऱ्याच्या दाराला बांगड्यांचा आहेर भेट देऊन निवेदन देण्यात आले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत, दीपक गुगळे, निलेश सातपुते, समर्थ शिंदे, अमित गांधी, शाहनवाज शेख, गौतमी ताई भिंगारदिवे, रोहिणी पवार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की येत्या ५ तारखेपर्यंत काम सुरू न झाल्यास अधिकाऱ्याना काळे फासणार असल्याचा इशारा जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी दिलेला आहे..

