*पुणे जिल्हा परिषद अधिकारी व शिक्षक समिती पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार. - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*
*शिक्षक समितीचे नुतन जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ यांचा सत्कार संपन्न.*
इंदापूर प्रतिनिधी: दि 1 शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या वतीने इंदापूर येथील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट घेवून तालुका , जिल्हा व राज्य स्तरावरील विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. पुणे सर्कीट हाऊसला समिती पदाधिकारी व सर्व अधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिक्षक समिती पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनिल वाघ यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हस्ते सन्मान करण्यात आला. राज्य स्तरावर मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी , सातव्या वेतन आयोगातील त्रूटी दूर कराव्यात त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील पुरवणी व मेडिकल बील रक्कम सहकार्य करावे. अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ , शिक्षक नेते हरिश काळेल व किरण म्हेत्रे यांनी विचार व्यक्त केले.
प्रसंगी तालुका अध्यक्ष ज्ञानदेव बागल , सरचिटणीस विनय मखरे , कोषाध्यक्ष भारत ननवरे , उपाध्यक्ष नजीर शिकीलकर , शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

