shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री. ना. रा. हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता कल चाचणी संपन्न.

 श्री. ना. रा. हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता कल चाचणी संपन्न.

लेंड ए हँड इंडिया पुणे व शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ३ मे २०२३ रोजी लेंड ए हँड इंडिया, पुणे व शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. ना. रा. हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता कल चाचणी घेण्यात आली. या ४ तासाच्या चाचणी साठी १४९ विद्यार्थी उपस्थित होते. 
          दिनांक ८ मे २०२३ रोजी “मानसिक क्षमता कल चाचणी” चा निकाल विद्यार्थी व त्यांच्या पालक यांना देण्यात आला. या प्रसंगी  विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्यात आले. सर्वांचे समुपदेशन झाल्यांनतर विद्यार्थी व पालक यांच्या असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यात आले. या समुपदेशन कार्यक्रमासाठी  १४९ विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यासाठी पुणे येथून संगीता निंबाळकर, मनीषा साठे, चंद्रकांत निंबाळकर उपस्थित होते. 
तसेच या प्रसंगी शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट चे खजिनदार व अल्फा बाईट चे प्राचार्य तुषार रंजनकर , ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर  शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख  महादेव चव्हाण सर, शंकरराव पाटील कोपिवरची शाळा चे प्रमुख. भारत बोराटे सर, ट्रस्टचे सल्लागार  . हमीदभाई आत्तार, अल्फा बाईटच्या इन्चार्ज चारुशीला शिंदे मॅडम, ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप तसेच दोन्ही संस्थेचे कमर्चारी उपस्थित होते.
close