राहाता:- राहाता येथील वैशिष्ठपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असलेले साई योग फाउंडेशनच्या वतीने नुकतेच रुजू झालेले नूतन प्रांताधिकारी माणिकराव आहेर,नूतन तहसीलदार अमोल मोरे तसेच गटविकास अधिकारी जालिंदर पटारे यांचे स्वागत करून सर्वांचा हृदय सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून साई योग फाउंडेशनच्या कार्याची माहिती देत फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांत सर्व नूतन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनची व सहभागाची विनंती करत त्याची महती विषद केली व सर्व नूतन अधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रांताधिकारी माणिकराव आहेर म्हणाले की मी पूर्वी येथे तहसीलदार असताना साई योग फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांत शक्य तेव्हा सहभागी होण्याचा प्रयत्न केला.फाउंडेशन सातत्यपूर्ण राबवित असलेले योग प्राणायाम,वृक्षरोपन व वृक्षसंवर्धन तसेच स्वच्छता अभियान इत्यादी कार्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.यापुढे आम्ही सर्व अधिकारी फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यात सहभागी होवू व शक्य ती मदत करू अशी ग्वाही दिली.
यावेळी साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे,पत्रकार किरण वाबळे,राजूभाई पठाण,ॲड.गोरखनाथ दंडवते,योगगुरु सुरेश भिंगारदिवे,बाळासाहेब गाडेकर,विनोद गाडेकर,रवींद्र धस,भानुदास गाडेकर,संजय वाघमारे,संजय उबाळे,वेंकटेश अहिरे,राजेंद्र फंड,आण्णासाहेब कांदळकर,शिवाजी पोटे,प्रकाश बेंद्रे,पांडुरंग गायकवाड,भागवत वाघमारे,शिवाजी पोटे,अशोक वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

