इंदापूर येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन साजरा.
इंदापूर (प्रतिनिधी):
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १०१ वा स्मृतिदिन इंदापूर येथील साठेनगर मध्ये युग प्रवर्तक श्री शाहू बहुद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा,मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, ॲड.गिरीश शहा, सामाजिक कार्यकर्ते प्रा.अशोक मखरे, आर. पी.आय. जिल्हा सचिव शिवाजी मखरे, मातंग एकता आंदोलनाचे पुणे उपजिल्हाध्यक्ष ललेंद्र शिंदे युग प्रवर्तक श्री शाहू बहुद्देशीय सेवा संस्थाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष उत्तम गायकवाड , कार्याध्यक्ष संतोष जामदार ,सदस्य प्रवीण राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुनील तळेकर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.
दीपप्रज्वलन भरतशेठ शहा यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रतिमेचे पूजन ॲड.गिरीश शहा ,विठ्ठल ननवरे, प्रा.अशोक मखरे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.बहुजन वंचित आघाडी इंदापुर शहर च्या वतीने प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी दत्ता जगताप , शिवाजी पवार ,हमीद भाई आतार, महादेव चव्हाण, रेशमा नौशाद शेख, ॲड.किरण लोंढे, ॲड.सूरज मखरे ,मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, अनिल ढावरे , सुरेश ढावरे, चंद्रकांत सोनवणे, सुभाष खरे, मयूर ढावरे , उमेश ढावरे रमेश शिंदे, पै.मारुती शिंदे इत्यादींनी उपस्थिती दर्शवून अभिवादन केले.

