shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी युवकांनी आपल्यातील वेगळेपण ओळखावे, मोठी स्वप्न बघावीत, जगाबरोबर स्पर्धा करावी व स्वतःला सिद्ध करावे यासाठी केवळ शिक्षण व ज्ञान हेच असे साधन आहे ज्यामुळे आपण परिस्थिती सुधारू शकतो असे प्रेरणादायी विचार सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. ते बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष गणपत लाल मुथ्था हे होते .यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एस.एन. पठाण, श्रीरामपूरचे माजी प्रांताधिकारी अनिल पवार,संस्थेचे उपाध्यक्ष अशोक नाना साळुंके, सचिव ॲड. शरद सोमाणी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड तसेच संस्थेचे पदाधिकारी दीपक सिकची, बापूसाहेब पुजारी,  नंदूशेठ खटोड, चंद्रशेखर डावरे, भरत साळुंके, श्रीवल्लभ राठी, रवींद्र खटोड, श्रीकृष्ण भालेराव, सुनिता ग्रोवर आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना गणेश शिंदे असे म्हणाले की, युवकांनी आपल्या आई-वडीलांना अभिमान वाटेल असे काहीतरी करावे.आपले यश मोजताना ते फक्त आपल्या आई-वडीलांच्या डोळ्यांत पाहून मोजावे व यशस्वी व्हावे.

यावेळी उद्घाटक डॉ.एस.एन. पठाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी संघर्षातून शिकले पाहिजे. शिक्षण संस्थांनी ज्यांना शिक्षण मिळालेले नाही अशा वंचित घटकांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी करून दिला. अहवाल वाचन स्वागताध्यक्ष  प्रा.प्रकाश देशपांडे यांनी केले. यावेळी गुणवंत शिक्षकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच शैक्षणिक, क्रीडा व विविध सांस्कृतिक स्पर्धा मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके, प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ऑल इंडिया मधील खेळाडू वेदांत भांड यास "इयर ऑफ द प्लेयर" या सन्मानाने गौरविण्यात आले .या वर्षाची जनरल चॅम्पियनशिप ऋषिकेश पुजारी यास देण्यात आली. या वर्षीचा "जिद्द" पुरस्कार स्वप्निल बडाख यास देण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विलास गायकवाड डॉ.विनायक काळे,प्रा.अशोक थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्वागताध्यक्ष प्रा.प्रकाश देशपांडे यांनी मानले .सदर कार्यक्रमासाठी पत्रकार नवनाथ कुताळ, दीपकसा क्षत्रिय, किशोर कदम तसेच अभिजीत रांका, अतुल शिंदे, जेटीएस हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीराम कुंभार , डॉ.विठ्ठल सदाफुले ,डॉ .संजय नवाळे , डॉ.अशोक माने , कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहीर,एसआरकेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी प्रफुल्ल खपके , विद्यार्थीनी प्रतिनिधी जया काळे ,दिनेश खामकर, बाळासाहेब लगे, भवर महाराज, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रा. निजाम शेख स्वागताध्यक्ष प्रा. प्रकाश देशपांडे तसेच युट्यूब लाईव्ह तंत्रज्ञ डॉ.मनोज तेलोरे ,डॉ. विठ्ठल लंगोटे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक , विद्यार्थी- विद्यार्थिनी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

close