shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा नरसिंहपुर येथील ज्ञानेश्वर डिंगरे यांच्या ६१ वर्ष पुर्ती निमित्त संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन.

निरा नरसिंहपुर येथील  ज्ञानेश्वर  डिंगरे यांच्या ६१ वर्ष पुर्ती निमित्त संगीत भागवत कथा ज्ञान  यज्ञाचे आयोजन.
 
इंदापूर प्रतिनिधी: श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवाचे पुजारी श्री ज्ञानेश्वर रंगनाथ डिंगरे यांच्या ६१ वर्ष पुर्ती निमित्त संगीत भागवत कथा ज्ञान  यज्ञाचे आयोजन  हा आगळावेगळा कार्यक्रमाला दि.१० मे पासून सुरुवात  झाली आहे.
 गुरुवर्य ह भ प  समर्थ भक्त श्री मंदारबुवा रामदासी  महाराज (भागवताचार्य) याचे वेद वाणीतून कथा होणार आहे.   भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे  रोज दु ३ ते ६ पर्यंत भागवत कथा पार पडत आहे .त्यामध्ये भागवत महात्म्य , ग्रंथपुर्व पिढीका, नृसिंहलिला, श्रीकृष्ण जन्मोत्सव , गोवर्धणधारक , रुख्मिणी स्वयंवर , सुदामचरित्र, अवधुत संवाद , द्वादश स्कंध अशा रोज विविध धार्मिक विषयावंर भागवत कथा पार पडत आहे .  दिनांक १६ मे रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे. विविध उपक्रम राबविले जाणार  आहेत अशी माहिती  श्री गणेश डिंगरे यांनी दिली. वडिलांच्या ६१ वर्षे पुर्ती  निमित्ताने कथेचे नियोजन केले उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्व भावीक भक्त आप्तेष्ट यांनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
close