श्रीरामपूर प्रतिनिधी:
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही येथील उम्मती सोशल वेलफेयर सोसायटी,श्रीरामपुर व तुलसी आय हॉस्पिटल,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील गरजू तसेच गोर- गरीब आबालवृद्धांसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणुन 'मोफत मोतीबिंदू व नेत्रचिकित्सा शिबिराचे' आयोजन शनिवार दि.१३ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत खा.गोविंदराव आदिक अँग्लो उर्दू हायस्कूल, वार्ड क्र.२, श्रीरामपूर याठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर शिबिरात नाशिक येथील नेत्रतज्ज्ञ हे मोतीबिंदू,काचबिंदू, तिरळेपणा, दृष्टिदोष (चष्म्याचा नंबर काढणे) तसेच इतर सर्व प्रकारच्या नेत्रविकारांवर मोफत चिकित्सा करणार आहेत, शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया नाशिक येथे करण्यात येणार आहे.
हे शिबिराचे ८ वे वर्ष असुन आतापर्यंत उम्मती तर्फे जवळपास ३५०० रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आलेले असुन पैकी सुमारे ११०० रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.
तरी सदरील शिबिराचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन ही उम्मती फाऊंडेशन चे अध्यक्ष - सोहेल शेख, उपाध्यक्ष- फिरोज पठाण (सर),सचिव डॉ. तौफिक शेख यांनी केलेले आहे.
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

