shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर पोलीस स्टेशनची शानदार कामगिरी...कालठण नं. २ ता. इंदापूर येथे पडलेल्या दरोडेच्या गुन्ह्यासह इतर ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस.

इंदापूर पोलीस स्टेशनची शानदार कामगिरी...
कालठण नं. २ ता. इंदापूर येथे पडलेल्या दरोडेच्या गुन्ह्यासह इतर ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस.

 १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ३ मोबाईलसह एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दरोड्याचे गुन्हे घडले होते ते गुन्हे उघडकीस आणण्याची शानदार कामगिरी इंदापूर पोलीस स्टेशनने पार पाडली.

याबाबत इंदापूर पोलीस स्टेशनने सदर माहिती दिली की, दि. ४ मे २०२३ रोजी रात्री १२ वाजून ४५ वाजता ते २ वाजून २० मिनिटं वाजेच्या दरम्यान मौजे कालठण नं. २ ता. इंदापूर जि. पुणे गावच्या हद्दीत ५ अनोळखी इसमानी तक्रारदार  नवनाथ मेटकरी यांचे घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून तसेच मारहाण करून विवो कंपनीचे २ मोबाईल तसेच  सागर नामदेव रेडके यांचे घराचे रूमचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ गुन्हेहाच्या घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शोध पथकास तपासाबाबत मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जबाबदारी दिली होती. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे शुभम उर्फ दिलशार अशोक पवार वय २२ वर्ष मु. दूधवडी ता. कर्जत जि. अहमदनगर ,उमेश अनिल काळे वय १९ वर्ष रा. लोखंडेवस्ती कटफळ ता. बारामती जि. पुणे व एक विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी गुन्हा करण्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी कालठण नं. २ येथे यापूर्वी केलेल्या २ तसेच वडापुरी ता. इंदापूर येथील घरफोडीचा असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आलेले आहे. अद्याप पर्यंत ३ आरोपीस अटक करण्यात आलेली असून १ आरोपी फरार आहे. अटक आरोपी त्यांच्याकडून त्यांनी चोरी केलेले ५ लाख रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ३ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार ,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, प्रकाश पवार ,सहाय्यक फौजदार भारत जाधव, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, शुभांगी खंडागळे, पोलीस नाईक संजय मल्हारी, सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, गजानन वानुळे, विनोद लोखंडे, लक्ष्मण सूर्यवंशी, गजेंद्र बिरलिंगे, अमोल खाडे, होमगार्ड संग्राम माने यांनी केलेली आहे.
close