श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: आज दिनांक १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी येथे महाराष्ट्र दिना निमित्त ध्वजारोहण शाळेचे जेष्ठ कर्मचारी श्री कोळी बी एम यांचे हस्ते करण्यात आले .
यावेळी महाराष्ट्र गीत, ध्वजगीत ,राष्ट्रगीत गाऊन मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी नववीच्या अभिनंदनास पात्र विद्यार्थी यांचे कार्ड वाटप पालकांच्या हस्ते करण्यात आले तसेच इतर इयत्ताचे कार्ड वाटप करण्यात आले.
यावेळी प्राचार्य भालचंद्र निंबाळकर व त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी उपस्थित होते.

