महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत- वसंतराव आरडे प्रवक्ते शिवसेना पुणे जिल्हा.
इंदापूर प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला त्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो व त्यांना धन्यवाद देतो या निर्णयामुळे पुढील दीड वर्षे शिंदे फडणवीस सरकार लोकहिताचे शेतकऱ्यांचे व सर्व घटकातील जनतेचे कामे अतिशय चांगल्या प्रकारे करतील व महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर राहील अशी आशा करून येणाऱ्या काळात सर्व निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका इत्यादी शिवसेना ताकतीने लढवणार त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार राहुल दादा शेवाळे मुंबई, माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र देवरे यांचेही अभिनंदन करून शुभेच्छा देतो व हे सरकार पुढील पाच वर्षे सत्तेत असणार आहे अशा शब्दात पुणे जिल्हा प्रवक्ते शिवसेना वसंतराव आरडे यांनी माहिती देताना व्यक्त केले.

