संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरून गोखळी गावाला जाण्यासाठी भुयारी मार्ग देण्यात यावा म्हणून गोखळी येथे केले अर्धा तास रस्ता रोको.
रस्ता रोको आंदोलनात गावकरी, गुरुकुल विद्या मंदिर शाळेचे शिक्षक पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी.
इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यातील गोखळी येथून जात असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरून गोखळी गावाला जाण्यासाठी भुयारी मार्ग, देण्यात यावा यासाठी गावातील नागरिक व गुरुकुल विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी पालक वर्ग यांनी बारामती इंदापूर रस्त्यावरील गोखळी येथे रस्ता रोको करून आंदोलन केले.
या रस्ता रोको आंदोलनासाठी संजय सोनवणे, धनगर ऐक्य परिषदेचे डॉ. शशिकांत तरंगे , तेजपृथ्वी ग्रुपचे संस्थापक नानासाहेब खरात,गुरुकुल विद्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणवळ गुरुजी, मा.जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले भाजपचे माऊली वाघमोडे,ग्रामपंचायत सदस्य बापू पोळ,माजी उपसरपंच सचिन तरंगे, बाळासाहेब चितळकर , सौ. नंदाबाई भानुदास चितळकर, तुकाराम वाघमोडे ,सोमनाथ झगडे ,बाळासाहेब महानवर सचिन तरंगे ,तुकाराम करे, माऊली शिंदे ,अनिल चितळकर, अर्जुन वाघमोडे ,हनुमंत वाघमोडे, नितीन गोफणे, कांताभाऊ वाघमोडे, आबा वाघमोडे, गोकुळ मकर ,अनिल कडाळे, सुभाष वाघमोडे, शंकर वाघमोडे,आम आदमी पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीने या आंदोलनासाठी पाठींबा दिला आहे तालुका अध्यक्ष रामचंद्र पाटील, अविनाश जाधव, महिला अध्यक्ष प्राजक्ताताई रासकर तसेच गोखळी व तरंगवाडी येथील सर्व ग्रामस्थ व विद्या मंदिर गोखळी येथील सर्व पालक रास्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित होते.
गोखळी गावाच्या नजीक सकाळी ११ वाजता रस्ता रोको करण्यात आला. यावेळी बाळासाहेब हरणावळ, नानासाहेब खरात, शशिकांत शेंडे, माऊली वाघमोडे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, सोनाईचे कुमारशेठ माने, धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे आदी मान्यवर व शेतकरी यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी आंदोलनात गावकरी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
फाट्यापासून ते तरंगवाडी बस स्थानकापर्यंतचा रस्ता थेट गोखळी गावाला देण्यात आला असून, गोखळी गावातून नागरिक किंवा प्रवासी निघाला तर त्याला इंदापूरकडे जाण्यासाठी तरंगवाडी बस स्थानकापर्यंत जावे लागेल. आणि तेथून मुख्य पालखी महामार्गावरूनच इंदापूरला वळावे लागेल. त्या रस्त्यावर वाहनांचे प्रचंड वेगात ये - जा होणार आहे. पुणे मुंबईकडे जाणारे वाहने देखील याच रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणार आहेत. त्यामुळे नियमित दररोज शाळेत येणाऱ्या विद्यार्थी आणि गावकऱ्यांना तेथील रस्ता ओलांडणे अतिशय कठीण आणि धोकादायक होणार आहे. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर येणे देखील कठीण होणार आहे. त्यामुळे गोखळी गावाला उड्डाणपूल द्यावे असे मागणी नागरिकांनी केलेली आहे.
फोटो ओळ : इंदापूर बारामती रोडवरील गोखळी येथे पालखी महामार्गावर निवेदन देताना गावकरी व मान्यवर

