shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर येथील प्रादेशिक संचालक साखर कार्यालयावर होणारे प्रहार चे "टाळे ठोक" आंदोलन..पुणे RRC च्या अंतिम निकाला पर्यंत पुढें ढकलले..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक ११ मे २०२३

अहमदनगर येथील प्रादेशिक संचालक साखर कार्यालयावर होणारे प्रहार चे "टाळे ठोक" आंदोलन..पुणे RRC च्या अंतिम निकाला पर्यंत पुढें ढकलले..!!

प्रहार च्या "टाळे ठोक" आंदोलनाच्या दणक्याने जिल्हयातील ०७ साखर कारखान्यांवर RRC (जप्ती) ची कारवाईस सुरूवात १५ मे रोजी राज्य साखर आयुक्त पुणे कार्यालयात अंतीम सुनावणी...

अहमदनगर : दि.१५ एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांच्या नेतृत्वात प्रादेशिक संचालक साखर अहमदनगर यांच्या कार्यालयाला "टाळे ठोक" आंदोलन होणार होते परंतु १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील एकूण सात साखर कारखान्यांवर RRC (जप्ती) ची कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांना पाठवून युटेक उर्फ गजानन साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल १० मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे लेखी पत्र प्रादेशिक संचालक व सह संचालक साखर श्री मिलिंद भालेराव व श्री प्रवीण लोखंडे यांनी आंदोलना पूर्वी दोन दिवस आधी लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती प्रशासनाच्या विनंतीचा मान ठेवून जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे व प्रहारच्या सहकाऱ्यांनी एकूण ३३ खाजगी व सहकारी साखर कारखान्यांपैकी थकीत ऊस बिल व पंधरवाडा व्याज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न केल्यास दि. ११ मे रोजी सर्व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या व सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उपस्थितीमध्ये अहमदनगर प्रादेशिक संचालक साखर यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे आंदोलन पत्र दिले होते परंतु प्रहारच्या आंदोलनाचा "धसका" घेत प्रादेशिक कार्यालयाने तातडीने ७ साखर कारखान्यांचा प्रस्ताव राज्य साखर आयुक्त पुणे श्री शेखर गायकवाड यांना RRC (जप्ती) अहवाल पाठवला होता.
 प्रादेशिक साखर कार्यालय अहमदनगर यांनी प्रहार चे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांना संपर्क करून आंदोलनापूर्वी समन्वय चर्चेसाठी येण्याची विनंती केली होती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे , प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे यांच्यासह १० मे रोजी सकाळी ११ वाजता प्रादेशिक संचालक कार्यालय साखर अहमदनगर येथे उपस्थित राहून उपसंचालक श्री प्रवीण लोखंडे यांच्याशी चर्चा करून ऊस बिल व पंधरवाडा व्याज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याने आपण व आपल्या कार्यालयाने संबंधित कारखान्यांवर काय कारवाई केली असे विचारले असता उपसंचालक लोखंडे यांनी राज्य साखर आयुक्त यांच्याकडे कलम ३(८) नुसार आदेश निर्गमित करणे बाबत कळविले आहे RRC (जप्तीचा) पाठपुरावा करून संबंधित ७ साखर कारखाने पैकी युटेक उर्फ गजानन महाराज शुगर संगमनेर, श्री साईकृपा अलाईड हिरडगाव श्रीगोंदा, गणेश कारखाना गणेश नगर राहता, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कारखाना पिंपळगाव पिसा श्रीगोंदा, अशोक साखर कारखाना अशोक नगर श्रीरामपूर, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे कारखाना शेवगाव, श्री वृद्धेश्वर कारखाना आदिनाथ नगर पाथर्डी या साखर कारखान्यांची RRC (जप्ती) संदर्भात दि. १५ मे रोजी राज्य साखर आयुक्त यांच्या दालनात सुनावणी निकाल होणार असल्याने अहमदनगर प्रादेशिक उपसंचालक साखर प्रवीण लोखंडे यांनी जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांना आंदोलन स्थगित करण्यासाठी लेखी पत्र देऊन संबंधित कारखान्यांवर केलेल्या कारवाई संबंधी होणाऱ्या सुनावणीच्या आदेशाच्या प्रति देऊन सर्व कारखान्यांबाबत दि.३० एप्रिल २०२३ पर्यंतचा एफ FRP रिपोर्ट देऊन आंदोलन रद्द करण्याची विनंती केली असता जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी दि.१५ मे रोजी राज्य साखर आयुक्त यांच्या दालनात होणाऱ्या सुनावणी निकालाचे रहस्य उलगडून शेतकऱ्यांन पर्यंत येईपर्यंत आंदोलन स्थगित करणार असल्याचे लेखी पत्र देऊन युटेक उर्फ गजानन साखर कारखान्याला प्रहार जनशक्ती पक्षाने पाठवलेल्या निवेदना पैकी ९९ टक्के शेतकरी बांधवांचे ऊस बिले मिळाले असून शेतकऱ्यांची संमती न घेता परस्पर ऊस बिलातून शेअर्स रक्कम कापल्यामुळे या कारखान्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना ऊस बिलातून कापलेली शेअर्स रक्कम परत करावी व खात्री करण्यासाठी उपसंचालक प्रवीण लोखंडे यांच्या मार्फत युटेक कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांची यादी व युटेक कारखान्याने जमा केलेल्या ऊस बिलाची यादी निवेदनाद्वारे तात्काळ मागितली आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close