मात्र डी जे च्या प्रचंड आवाजाने नागरिक त्रस्त
प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा : १५ / छत्रपती संभाजी महाराज यांची ३६० वी जयंती करमाळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मात्र करमाळ्यात जयंतीच्या निमित्ताने डी जे च्या अति मोठ्या तीव्र प्रचंड आवाजाने लोकांना मात्र भयंकर् त्रास सहन करावा लागला . पोलीस प्रशासनाने ही नियमबाह्य आवाजावर कोणताही आक्षेप घेतलेला दिसुन आला नाही . पोलिस प्रशासनाने फक्त बघ्याची भुमिका घेतल्याचे नागरिकां कडून समजते .याबद्दल जेष्ठ नागरिक व युवकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते .
यावेळी सकाळपासूनच
छत्रपती संभाजी महाराजांच्या
पुतळ्यासमोर विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले.

