shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कराड ते मंत्रालय मुंबई धडक मोर्चाच्या" नियोजना संदर्भात बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!!"

"खेड तालुक्यातील चासकमान, भामा आसखेड कालवा पुनर्वसन अंतर्गत४० वर्षां पासून टाकलेले अन्याय कारकरित्या शेत जमिनीवर टाकलेले  शिक्के काढण्याच्या प्रश्न संदर्भात  "कराड ते मंत्रालय मुंबई धडक मोर्चाच्या" नियोजना संदर्भात बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!!"

        सोमवार दिनांक १५/५/२०२३ रोजी सकाळी १०:०० ते १२:००या वेळेत काळुस या ठिकाण पुणे जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठक संपन्न झाली.
      पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांची आपल्या न्याय हक्कासाठी "कराड ते मंत्रालय मुंबई धडक मोर्चा"सोमवार दिनांक २२/५/२०२३ पासून आयोजित करण्यात येणार आहे.  
     रयत क्रांती संघटने अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक शेतकरी या आंदोलन सहभागी होणार आहेत.
        महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबरोबर  बरोबर खेड तालुक्यातील चासकमान, भामा आसखेड धरण अंतर्गत खेड तालुक्यातील काळूस भागातील २५ पेक्षा अधिक गावातील शेती  जमिनीवर ४० वर्षापासून पुनर्वसनाचे शिक्के टाकले आहेत. प्रत्यक्षात कालव्याद्वारे येणारे पाणी या भागाला येत नाही. कालवे रद्द झाले आहे. लाभ क्षेत्रात ही गावे येत नसताना अन्यायकारक पद्धतीने हे शिक्के तसेच ठेवले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन विकणे, कर्ज काढणे, जमिनीचे कुटुंबातवाटप करणे, दलालान मार्फत जमिनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणे. यासारख्या अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.शिक्के काढण्यासंदर्भा येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या आंदोलने केली तरीही त्यांना न्याय मिळत नाही म्हणून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी "कराड ते मुंबई धडक मोर्चा" आयोजित करण्यात आला आहे.
       या धडक मोर्चाच्या नियोजनासाठी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची बैठक घेऊन मोर्चामध्ये सहभागी होण्याची नियोजन करण्यात आले.
       धडक मोर्चात सहभागी होऊन न्याय घेतल्याशिवाय राहायचे नाही. अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी बैठकत ठरवली  असून वाड्यावर घरोघरी जाऊन बाधित शेतकऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना मंत्रालय धडकमोर्चात  जास्तीत जास्त संख्येने सहभाग होण्याचे प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले असून त्यानुसार नियोजन करून त्याचीअंमलबजावणी सुरू झाली आहे ‌.
       बाधित शेतकरी, महिला, लहान मुले जनावरे व स्वतःची वाहने घेऊन मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
       या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. सूर्यकांत काळभोर, रयत क्रांती संघटना प्रदेश प्रवक्ते मा.गजानन गांडेकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, उपस्थित होते.
       खेड तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष, श्री. सुभाषराव पवळे, युवाअध्यक्ष श्री. सुनील पोटवडे, विठ्ठलशेठ आरगडे, विश्वनाथ पोटवडे, बाळासाहेब दौंडकर, बाळासाहेब खलाटे, भरत आरगडे, मिनीनाथ साळुंखे, सुरेश कौंटकर, वसंतराव लोणारी, दत्ता सुक्रे, पांडुरंग गायकवाड, यांच्यासह अनेक शेतकरी सदर बैठकीसाठी उपस्थित होते.
close