नैराश्येतून आरोप,प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न..!
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
रेणूका माता कृषी विकास प्रतिष्ठाण अंतर्गत येणार्या सात निवासी शाळा व मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये रेशन घोटाळा झाल्याचा आरोप राजकीय द्वेषापोटी केलेला आसून या अगोदर देखिल याच प्रतिष्ठाणच्या अनेक तथ्यहीन तक्रारी प्रशासनाकडे दिलेल्या आहेत.
परंतू प्रशासनाने केलेल्या चौकशीत तक्रारी तत्यहीन आसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.दरम्यान यानंतर देखिल राजकीय विरोधक रेणूका माता कृषी विकास प्रतिष्ठाणवर राजकीय द्वेषापोटी व नैरशेतून आरोप करत आसून आरोप तत्यहीन आसल्याचे अनेकदा प्रशासनाच्या चौकशीत सिद्द झाले आसल्याचे प्रतिष्ठाणचे सचिव विजयकांत मुंडे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
केज तालुक्यातील देवगाव येथिल रेणूका माता कृषी विकास प्रतिष्ठाण अंतर्गत येणार्या काही निवासी शाळा व वसतिगृह शासन नियमाच्या अधिन राहून सुरू आहेत.त्यामध्ये कसल्याही प्रकारचा बोगसपणा अथवा धान्य घोटाळा झालेला नसून विरोधकांनी केलेला भ्रष्टाचाराचा आरोप राजकीय द्वेषापोटी व नैराशेतून आसल्याचे प्रतिष्ठाणचे सचिव विजयकांत मुंडे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान सबंधित तक्रारदार नेहमीच रेणूका माता कृषी विकास प्रतिष्ठाणवर राजकीय द्वेषापोटी व नैराश्येतून भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे.या अगोदर देखिल रेणूका माता कृषी विकास प्रतिष्ठाण अंतर्गत येणार्या विविध संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदरील विरोधकाने अनेकदा केला आहे.त्या अनुषंगाने प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली आहे.
परंतू केलेल्या एकाही आरोपात आद्याप पर्यंत तथ्य आढळून आलेले नाही.दरम्यान तक्रारी करणे हा यांचा दररोजचाच धंदा आसून या माध्यमातुन हा हे आपला खिसा गरम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे.परंतू रेणूका माता कृषी विकास प्रतिष्ठाणवर त्याने केलेल्या आरोपात कसलेच तथ्य नसून हा फक्त राजकीय द्वेषापोटी व नैराश्येतून रेणूकामाता प्रतिष्ठाणवर भ्रष्टाचाराचे आरोप करून प्रसिद्दीचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.त्याने केलेल्या तक्रारीत कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे प्रतिष्ठाणचे सचिव विजयकांत मुंडे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

