संगमनेर:- स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमीत्त शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटना दरवर्षी भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते. बिरेवाडी पंचक्रोशीतील बालक जास्तीत जास्त संख्येने या बालसंस्कार शिबिरात सहभागी होत असतात. वर्षानुवर्षे बालसंस्कार शिबिरात सहभागी होणाऱ्या बालकांची संख्या वाढत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार शिबिर म्हणजे बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व विकास, समाजातील एक जबाबदार व्यक्तिमत्व घडण्यास तसेच सर्वांगीण विकासासाठी एक पर्वणीच ठरत आहे.
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांच्या संकल्पनेतून सदरचे बालसंस्कार शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवश्री शिवनाथभाऊ नाईकवाडी(अ.नगर जिल्हा संघटक, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य) यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. युवानेते श्री. तुषारशेठ ढेंबरे, निलेश सागर, अभिजित नान्नर, जालिंदर गुळवे, अक्षय बस्ते, राजेंद्र ढेंबरे, अभय ढेंबरे, अक्षय ढेंबरे, तसेच बिरेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान मिळाले.

