इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार
प्रतिनिधी : संजय वायकर
चिचोंडी पाटील : १५ / नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील लग्नेश चंद्रकांत पवने यांची Assistant Engineer जलसंपदा विभाग (वर्ग 2 राजपत्रित)अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल पंचायत समिती सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागात शालेय शिक्षण घेतलेल्या व अतिशय सामान्य कुटुंबातील या युवकाने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जाण्याचे आई-वडिलांचे स्वप्न कठोर परिश्रम घेऊन पूर्ण केले असल्याचे प्रतिपादन सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांनी केले व लग्नेशला भावी शासकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल ग्रामस्थांनी लग्नेश पवणे यांचा नागरी सत्कार केला.
यावेळी शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे,सरपंच शरद पवार, चेअरमन महादेव खडके, उपसरपंच महादजी कोकाटे, व्हा.चेअरमन डॉ.मारूती ससे,मा.सरपंच दिलीप पवार, लोकमान्य पतसंस्थेचे चेअरमन सुरेश ठोंबरे,ग्रा.पं.सदस्य विश्वसागर कोकाटे, प्रशांत कांबळे,भाऊसाहेब ठोंबरे ज्ञानेश्वर ठोंबरे,संदीप काळे, बाबासाहेब परकाळे,प्रशांत कोकाटे,दत्ताभाऊ वाडेकर, शिवसेना नेते महादेव खडके, नानासाहेब कोकाटे,राजूभाऊ कोकाटे,निखिल पवार, बाबासाहेब शेंडकर,प्रकाश कोकाटे,काशिनाथ बेल्हेकर, देविदास आगलावे,अनिल चव्हाण,जयसिंग दळवी,शैलेश देवकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

