shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा सेना नगर तालुका प्रमुख पदी सचिन ठोंबरे यांची निवड ...


पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार - सचिन ठोंबरे

प्रतिनिधी : संजय वायकर

चिचोंडी पाटील : १५ / नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे युवा नेतृत्व सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा कृषी धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे ३६५ दिवस २४ तास कधीही उपलब्ध असणारे सर्वसामान्य जनतेच्या मनातलं नेतृत्व श्री . सचिन (काका )ठोंबरे पाटील यांची नगर तालुका युवा सेना तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे .वंदनीय हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार त्यांना जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख मा. महापौर श्री अनिल माधवराव शिंदे  यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले .

 याआधी त्यांची नगर तालुका युवा सेना उप तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली होती .परंतु शिवसेना पक्ष वाढीसाठी असणारे कार्य सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्वसामान्य तळागाळातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची असणारे हातोटी पाहता त्यांना नगर तालुका युवा सेना तालुकाप्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली . त्यांचे या नियुक्ती बद्दल नगर तालुक्यामध्ये व चिचोंडी पाटील गावांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे .

वंदनीय हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार आहे तसेच शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार आहोत असा विश्वास त्यांनी दर्शविलेला आहे .

 यावेळी शिवसेना मा. महापौर जिल्हाप्रमुख श्री अनिल माधवराव शिंदे संपर्कप्रमुख श्री . सचिन भाऊ जाधव नगर शहर प्रमुख श्री . दिलीप दादा सातपुते  उपजिल्हाप्रमुख श्री . आनंदरावजी शेळके पाटील तालुकाप्रमुख श्री . संग्राम बबनराव शेळके पाटील आदी मान्यवर व इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते .
close