shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य व आपत्तीमध्ये रेड क्रॉस चे कार्य समर्पणाचे आहे - प्रांताधिकारी सावंत.

रेड-क्रॉसच्या सेवा सप्ताहाचा माळवडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रारंभ.

श्रीरामपूर प्रतिनिधी:
 रेड क्रॉस सोसायटी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जनतेच्या कल्याणासाठी व सुरक्षेसाठी सेवा कार्य करणारी संस्था आहे. दुसऱ्या महायुद्धापासून सुरू झालेल्या या संस्थेने आज पर्यंत जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात सेवाकार्य करून आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये प्रत्येक स्वयंसेवक पद, प्रतिष्ठा, दर्जा विसरून समर्पित वृत्तीने काम करत असतात. जागतिक शांतता व सुरेक्षेमध्ये रेड क्रॉस अग्रभागी असते. विशेषता गावोगावी आरोग्य शिबिरे आरोग्य विषयक जनजागृती मोहीम तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाच्या वेळी रेड क्रॉस झोकून काम करते. आरोग्य व आपत्ती क्षेत्रात रेड क्रॉस चे कार्य समर्पित वृत्तीचे असल्याचे प्रतिपादन रेड क्रॉस श्रीरामपूर चे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांनी व्यक्त केले.

जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त श्रीरामपूर रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात सेवा सप्ताहाचा प्रारंभ किरण सावंत -पाटील यांच्या शुभहस्ते माळवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीप प्रज्वलन करून करण्यात आला.
सेवा सप्ताह निमित्त माळवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिर तपासणी व औषधे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष किरण सावंत -पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते. 
 प्रास्तवीकामध्ये सचिव सुनील साळवे यांनी माळवडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, सेवा, स्वच्छता, गतिमानता या वैशिष्टपूर्ण गुणांची प्रशंसा करत येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी समर्पित वृत्तीने काम करत असल्यामुळेच या आरोग्य केंद्राला आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र हा पुरस्कार मिळाला असे सांगत केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी स्वागत संजय दुशिंग यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी व आरोग्य तपासणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहेल शेख, डॉ. असीम सय्यद, डॉ. स्वप्नील पुरनाळे, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन, केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कांचन सारंगधर, डॉ. सैंदोरे, डॉ. अनाप, डॉ. गोर्डे, डॉ. उंडे आदींनी केली.
  
जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक संजय दुशींग यांनी कुष्ठरोग संशयित रुग्णांची तपासणी करून उपचार सुरू केले. क्षयरोग तंत्रज्ञ श्री. प्रकाश मेतकर यांनी संशयित क्षयरोग रुग्णांची तपासणी केली. शिबिरामध्ये पंचक्रोशीतील १०३ रुग्णांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र व रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. 

सूत्रसंचलन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कांचन सारंगधर यांनी केले. तर आभार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूहेल शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, सुनील साळवे, प्रवीण साळवे, भरत कुंकूलोळ, पोपटराव शेळके, श्रावण भोसले, संजय दुशिंग, बाळासाहेब पाटोळे, प्रकाश मेटकर, सुधाकर पीलगर, प्रेमनाथ सोनुने, साहेबराव रक्टे, सुरेश वाघुले, संतोष सोनवणे, माळवडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

close