shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांचा सेवानिवृत्‍ती निमित्‍त सत्कार सोहळा संपन्न


अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा): अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपत कुलकर्णी हे नियत वयोमानानुसार ३० एप्रिल  २०२३ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्‍यानिमित्‍त कार्यालयातर्फे त्‍यांना सन्‍मानपुर्वक निरोप देण्‍यात आला.

या निरोप समारंभाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, नव्यानेच पदभार स्विकारलेले अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, बिल्डर्स असोसिएशयन ऑफ इंडियाच्या अहमदनगर शाखेचे अध्यक्ष दिपक दरे, उदय मुंढे, अनिल कोठारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री.कुलकर्णी यांनी आपल्या शासकीय सेवेची सुरुवात सहाय्यक अभियंता श्रेणी-१ या पदावरुन मार्ग प्रकल्प उपविभाग क्र.२ अहमदनगर येथूनच केली होती. तद्नंतर त्यांनी नांदेड, गंगाखेड, औरंगाबाद येथे काम केले. कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी लातूर, अकोला, (पेण) जि.रायगड, अहमदनगर, पुणे येथे काम केले. अधीक्षक अभियंता म्हणून रत्नागिरी व नंतर अहमदनगर सा.बां.मंडळ येथे कार्यरत होते.
अहमदनगर बायपास रस्त्यावरील निंबळक व अरणगांव येथील रेल्वे उड्डाणपूल, अहमदनगर बायपास, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, सामाजिक न्याय भवन, लोणी येथील सामाजिक न्याय खात्याच्या मुलांचे व मुलींचे वसतीगृह इमारत ही उल्लेखनीय कामे त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाली. शासनाच्या आशियाई विकास बँकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते प्रकल्पाअंतर्गत राज्याचे "समन्वय अधिकारी" म्हणून त्‍यांनी केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. 
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*
close