shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची नगर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर

कक्ष जिल्हा संघटक'पदी अशोक थोरे तर कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस पदी ऍड. राहुल नवले -

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) राजकीय बातमी 

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अहमदनगर (उत्तर) जिल्हा पदाधिकारी यांची अधिकृत निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव मा. अनिल देसाई साहेब यांनी नुकतीच जाहीर केली असल्याची माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर यांनी शिर्डी येथे  पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या उत्तर नगर जिल्ह्याच्या कक्ष जिल्हा संघटक'पदी श्रीरामपूर येथील प्रसिद्ध उद्योजक, शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक अशोक मामा थोरे यांची निवड झाली असून कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस'पदी राहाता तालुक्यातील प्रसिद्ध विधितज्ञ् ऍड. राहुल भास्करराव नवले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातील जेष्ठ आणि तरुण शिवसैनिकांना निवड प्रक्रियेत समान संधी मिळाल्याने नगर जिल्ह्यात भगवे वातावरण तयार होऊन अनेकांनी निवडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. यात उर्वरित पदाधिकारी निवड खालीलप्रमाणे,
कक्ष जिल्हा सह संघटक : प्रमोद कुलट (संगमनेर,अकोले,राहाता); दत्ता कडू  (कोपरगाव,श्रीरामपूर,नेवासा,राहुरी) कक्ष उपजिल्हा संघटक : मिलिंद नाईकवाडी (संगमनेर,अकोले); अशोक पवार (कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर); काळू हाटकर (नेवासा, राहुरी) कक्ष तालुका संघटक : अमोल शिंदे (कोपरगाव); श्रीकांत शेळके (श्रीरामपूर); जयराम कदम (नेवासा); कृष्णा पोपळघट (राहुरी); रिंकेश जाधव (राहाता); सदाशिव हासे (संगमनेर); लक्ष्मण शेळके (अकोले) कक्ष तालुका सह संघटक : रोहित पवार (कोपरगाव); अमित कोलते (श्रीरामपूर); आदिनाथ फाटके (नेवासा); लतिका गोपाळे (राहुरी); गणेश सातपुते (राहाता); प्रविण कडलग (संगमनेर); संदीप डोंगरे (अकोले) कक्ष शहर संघटक : रविंद्र कथले (कोपरगाव); जगदीश बिरारी (श्रीरामपूर); कैलास जिरे (नेवासा); योगेश घाडगे (राहुरी); रविंद्र सोनवणे (राहाता); योगेश बिचकर (संगमनेर); विक्रम मालुंजकर (अकोले) आदी निवड जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष राज्य सरचिटणीस विजय मालणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून सर्व सचिव सह सचिव, खजिनदार व सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. यात विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातून शिवसेनेचे संपर्कप्रमुख, माजी मंत्री बबन नाना घोलप, दक्षिणचे सह संपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लभडे, मुजीब शेख, जेष्ठ नेते राजेंद्र झावरे, नितिन औताडे, राजेंद्र पठारे, अरुण पाटील, रामदास गोल्हार, जयवंत पवार, मधुकर तळपाडे, माधवराव टिटमे, महेश नवले आदींनी सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शिर्डी येथे अधिकृत मध्यवर्ती जिल्हा कार्यालय असून ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून आम्ही संघटित काम करत असल्याची भावना मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केली. यावेळी श्री सिनगर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 10 वर्षापासून आम्ही कार्यरत असून आजवर जिल्ह्यातील एकूण 3000 पेक्षा जास्त ग्राहकांच्या अडचणी सोडविल्या आहेत. आजवर सतत पाठपुरावा करत कायदेशीर मार्गाने ग्राहकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने अनेक कार्यकर्ते शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतात, हिच आमच्या प्रामाणिक कामाची पावती असल्याचे स्पष्ट केले. लवकरच जिल्ह्यात गाव तेथे कक्ष संघटक निर्माण करणार असून येत्या तीन महिन्याच्या आत 100 शाखांचे उदघाटन कक्षाचे अध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांची अधिकृत वेळ घेऊन करणार असल्याबाबत पत्रकार परिषदेत जाहीर खुलासा केला आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हाथ बळकट करण्यासाठी आम्ही संघटित पुढे सरसावलो असून यापुढे अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणार करणार असल्याचे शेवटी स्पष्ट केले.
close