shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गांजपूरच्या शेतकरी पुत्रांनी वडीलांची उंचावली मान...

चि.विनोद,चि.करणकुमार व कु.छाया यांची पोलीस दलात भरती !! 


 प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                                            

किल्ले धारूर तालुक्यातील गांजपूर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून परिचित आहे.

 या गावाला आता अधिकारी कर्मचारी यांचे गाव म्हणून ओळख प्राप्त होत आहे.

गावचे सुपुत्र प्रा.ईश्वर मुंडे यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामुळे गरीबातील गरीब पालकांची मुले-मुली गावातच ईयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेत आहेत.पुढे विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होत आहेत.विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धेचे वातावरण निर्माण झालेले आहे.यामुळे गांजपूर ची वेगळी ओळख निर्माण होत आहे.

     


श्री महादेव मोहनराव डापकर हे स्वत: पदवीत्तर पदवी(एम.ए) धरणग्रस्त आहेत.योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न झाल्यामुळे त्यांचे  शासकीय किंवा निम शासकीय सेवेत नौकरी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहीले. हे स्वप्न मुलांच्या माध्यमातून पुर्ण करू.या साठी मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही या साठी आपल्या शेतीत पती-पत्नीने दिवसरात्र मेहनत करून मुलांना शैक्षणिक सुविधा व आर्थिक पुरवठा केला.

   

 याचा परिणाम म्हणून चि.विनोद महादेव डापकर हा मुंबई पोलीस दलात भरती झाला आहे तर दुसरा मुलगा चि.करणकुमार महादेव डापकर याला राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत पदक प्राप्त होऊन तो पुणे पोलीस दलात भरती झाला आहे.त्यांना दोनच मुले असून दोन्ही शासकीय सेवेत भरती झाल्यामुळे त्यांच्या मेहनतीचे चिज झाले आहे.

           

श्री पंडीत नरहरी डापकर यांनी आपले दहावी पर्यंत चे शिक्षण पुर्ण करून शेती करून मुलांना चांगले शिक्षण देवू त्यांच्या सुख समाधानातच आपले सुख समाधान समजू असे म्हणत मुलगा चि.प्रदिप व मुलगी कु.छाया हिला चांगले शिक्षण दिले.

    

जिद्द,चिकाटी व मेहनत केली तर कांहीच अशक्य नाही हे कु.छाया पंडीत डापकर हीने दाखवून दिले. ती मुंबई रेल्वे पोलीस दलात भरती होऊन तीने गांजपूर येथील पहिली महीला पोलीस कर्मचारी होण्याच्या सन्मान मिळवला आहे.चि.प्रदिप हा स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे.तो पण लवकरच स्पर्धा परिक्षेत यश मिळवील अशी गावकऱ्यांना आशा आहे.

      

गांजपूर येथील मुलांच्या स्पर्धेत मुली ही मागे नाहीत हे कु.प्रणीता शांतीनाथ मुंडे हिने एम.बी.बी.एस.एम.डी.वैद्यकीय पदवीत्तर पदवी घेऊन सिध्द करून दाखवले आहे. 

     

या पुर्वी गांजपूरचे प्रशांत आनंदराव मुंडे हे  सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत औरंगाबाद येथे,बालासाहेब नरहरी डापकर हे पोलीस हेड कॅान्स्टेबल पदावर माजलगाव येथे,राष्ट्रीय खेळाडू उत्तरेश्वर आबासाहेब डापकर हे पोलीस कॅान्स्टेबल पदावर गडचिरोली येथे,गणेश गंगाराम डापकर हे सी.आय.एस.एफ.दिल्ली येथे तर सोमेश्वर तुकाराम घुगे हे सी.आर.पी.एफ येथे कार्यरत आहेत.

गांजपूर येथील शेतीसाठी सिंचनाची फार मोठी सुविधा व पाणी उपलब्ध नसल्याने शेतीचे उत्पन्न कमी प्रमाणातच आहे या मुळे युवक-युवतींनी उच्च शिक्षण घेऊन आपला नाव लौकिक करावा या साठी साने गुरूजी सार्वजनिक वाचनालय,गांजपूर येथे स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक असलेली पुस्तके उपलब्ध केलेली आहेत.त्यांचा लाभ घ्यावा असे अवाहन प्रा.ईश्वर मुंडे यांनी केले आहे.

close