जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे येथे समर कँप गँदरींग आयोजन.
साहसी खेळ यांची प्रात्यक्षिके करुण विद्यार्थींनी जिंकली उपस्थितांची मने .
इंदापूर प्रतिनिधी: जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे (ता - बारामती) १३ मे२०२३ ते २३ मे २०२३ पर्यंत समर कँप आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार २३मे रोजी सायं ६ वा समर कँप गँदरींग आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे शहर पोलिस दलात कार्यरत असलेले गणेश जगदाळे, माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखाना जेष्ठ संचालक सुरेश खलाटे (लालामामा) ज्ञानसिंधू प्रतिष्ठान कमांडो ट्रेनिंग फोर्स संस्थापिका अध्यक्षा वैशालीताई जगदाळे , मा. संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना लक्ष्मण जगताप, अमरसिंह जाधवराव, ज्ञानेश्वर कोकरे मा. उपसरपंच ग्रामपंचायत पवईमाळ , सनक्रिस्टल फाउंडेशनचे संतोष मचालेसर,रघुनंदन पतसंस्था संस्थापक नामदेव धुमाळ सर, सामाजिक कार्यकर्ते विलास खलाटे, धनसिंग जगताप, बाळासाहेब भोईटे, श्रीकांत जगताप , राजेंद्र जाधव मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थींनी ढाल तरवारबाजी, लाटीकाठी, मल्लखांब, धनुर्विद्या, रायफल शूटिंग,ड्रिल परेड, मार्शल आर्ट, दानपट्टा ,जिम्नास्टिक, मिडब्रेन व इतर साहसी खेळ यांची प्रात्यक्षिके करुण विद्यार्थींनी उपस्थितांची मने जिंकली. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत स्कूल टिचर मनिषा जगताप यांनी केले,.प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विनोद जगताप सर यांनी केले तर आभार स्कूलच्या प्रिन्सिपल स्वरांजली विनोद जगताप यांनी मानले.

