बघ ते आता दंगल घडवून आणतील
पाळलेले दलाल दंगली साठी सोडतील ll
ते ना हिंदू ना मुसलमान असतील
दंगलीसाठी पोसलेले सत्तेचे भडवे असतील
काही भगवे झेंडे घेवून मजिद पुढे नाचतील
काही हिरवे झेंडे घेवून मंदिरात घुसतील
बघ ते आता दंगल घडवून आणतील
पाळलेले दलाल दंगली साठी सोडतील ll
ते पुन्हा एखादा अखलाक जिवंत मारतील
एखादा निष्पाप साधू दगडाने ठेचून काढतील
खैरलांजी सारखं एखादं हत्याकांड करतील
ग्राहम स्टेंस सारखं जिवंत जाळून टाकतील
बघ ते आता दंगल घडवून आणतील
पाळलेले दलाल दंगली साठी सोडतील ll
काश्मीर, केरला फाईल सारख्या
चित्रपटातून वातावरणात निर्मिती करतील
चिथावणी खोर भाषणानी माथी भडकवतील
जमलंच तर देशावर एखादा हल्लाही करतील
बघ ते आता दंगल घडवून आणतील
पाळलेले दलाल दंगली साठी सोडतील ll
काहीच होत नाही म्हंटल्यावर
ते पुतळ्याची विटबंना करतील
फेक आयडी द्वारे महापुरुषांच्या
चारित्र्यावर चिखलफेक करतील
बघ ते आता दंगल घडवून आणतील
पाळलेले दलाल दंगली साठी सोडतील ll
तुम्ही मात्र आता सावध व्हा !
धर्मद्वेषाला बळी न पडता भारतीय व्हा !!!
🖋️ विश्वरत्न एकच

